धानोरा येथे दोन कुटुंबांची भेट; महिलांना शिलाई मशीन, मुलांना सायकली व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
सिल्लोड : शेतकरी आत्महत्येमुळे दुःखाच्या छायेत असलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी धानोरा (ता. सिल्लोड) येथे जाऊन दोन शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. दीपक माधवराव काकडे आणि सीताराम भागाजी काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला व धीर दिला.
दिवाळीनिमित्त महिलांना शिलाई मशीन, मुलांना सायकली, कपडे, फटाके आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सत्तार यांनी कुटुंबीयांसोबत पारंपरिक ग्रामीण पद्धतीच्या भाकरी-पिठल्याच्या जेवणाचाही आस्वाद घेतला.
संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांनी स्वतःला एकटे समजू नये, समाज त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास देण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अशा कुटुंबांना वेळीच आधार, संवाद आणि सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

No Comment! Be the first one.