विविध जिल्ह्यांसह राज्यातील क्रिकेट संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
बालाजी देवकत्ते उदगीर
उदगीर : शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या आमदार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानेश्वर बिरादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, जिल्हा परिषद सदस्य मटके सर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध विभागांतील पदाधिकारी, नगरपालिकेचे सभापती व नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात विविध खेळांच्या स्पर्धांचे आणि उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरात क्रीडा विभागाचे क्रीडा संकुल उभारल्यानंतर क्रिकेटप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरत आहे.
या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांसह राज्यातील अनेक क्रिकेट संघ उदगीरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरात क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
उदगीरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारी ही स्पर्धा ठरणार असून, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

No Comment! Be the first one.