लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजनाताई जाधव यांच्या माध्यमातून कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी बांधवांना दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.
समाजातील कष्टकरी, शेतमजूर घटकालाही दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा करता यावा, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन गरजू महिला, शेतमजूर कुटुंबांना दिवाळीचे किट वाटप करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि कामगार बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी सर्व कष्टकरी बांधवांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या शिधा वाटप कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना चिकलठाण विभागाचे पदाधिकारी विनोद चव्हाण, बंटी चव्हाण, शुभम चव्हाण, आकाश चव्हाण, अमित गायकवाड, रामू हिरे, गुरु चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच गोरगरिबांच्या पाठीशी उभे आहोत. दिवाळी हा आनंदाचा सण सर्वांनी एकत्र साजरा करावा, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे असे यावेळी विनोद चव्हाण यांनी सांगितले.
No Comment! Be the first one.