उभ्या हायवावर कार धडकली
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
बोरवंड या रस्त्यावर उमरी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका हायवा टिप्परवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात परभणीतील गांधी पार्क भागातील शेळके दांपत्याचा मृत्यू झाला.
तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. हि दुर्देवी घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
परभणी येथील मध्यवस्तीतील गांधी पार्कतील रोहित दिलीपराव शेळके (वय 38) व माधवी रोहित शेळके (वय 35) हे दोघे दांपत्य मुलगीसह ब्रम्हपुरीला गेले होते.तेथून ते कारने परतत होते. त्यावेळी उमरी फाट्याजवळ रस्त्यावरच उभ्या असणाऱ्या टिप्परवर कार मागच्या बाजूने आदळली. त्यात या दोघांचा मृत्यू झाला. तर मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना दाखल केले.
या दुर्दैवी घटनेने परभणीतील गांधी पार्क भागात मोठी शोककळा पसरली आहे. रोहित उर्फ बंटी या नावाने सुपरिचित रोहित यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
दरम्यान या दांपत्यावर दुपारी बारा वाजता परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित यांच्या पश्चात आई , भाऊ, वहिनी व एक मुलगी असा परिवार आहे.

No Comment! Be the first one.