आकाश पाळणे , मौत का कुआं, खेळांचे विक्रेते दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रोत्सवाच्या तयारीस प्रशासनाने सुरुवात केली असून, आकाश पाळणे, मौत का कुआं तसेच विविध खेळांचे विक्रेते यात्रास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यात्रेतील गर्दी लक्षात घेता सुरक्षा, वाहतूक, वाहनतळ, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. आकाश पालने, मौत का कुआं व इतर मनोरंजनाच्या खेळांची सुरक्षितता तपासून आवश्यक परवानग्या व सुरक्षा उपायांची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यात्रा परिसरात नियमित स्वच्छता, पुरेसा पाणीपुरवठा, वैद्यकीय पथके, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कर्णपुरा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
No Comment! Be the first one.