लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : वेडिंग फोटोग्राफीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि छायाचित्रणातील बदलत्या कार्यपद्धतींची माहिती देण्यासाठी ‘एआय आणि वेडिंग फोटोग्राफी’ या विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सयाजी हॉटेल येथे ९ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी झालेल्या या सेमिनारमध्ये सुमारे १६० छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला. औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन, वर्धमान फोटो एम्पोरियम आणि प्रोएवी प्रोफेशनल ऑडिओ व्हिज्युअल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रसिद्ध पुरस्कारविजेते वेडिंग फोटोग्राफर रॉबिन सैनी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विविध एआय सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार करणे, वेडिंग फोटोग्राफीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि कामाचा वेग व गुणवत्ता वाढविण्यासाठी योग्य वर्कफ्लो विकसित करणे, याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. व्हिडिओ शूटिंग, ध्वनिमुद्रण आणि अल्बम निर्मितीमध्ये एआयची उपयुक्तता स्पष्ट करताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
मोबाईलवरून करता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग
सेमिनारमध्ये गणेश उमरीकर यांनी विकसित केलेल्या बीटा सॉफ्टवेअरची माहिती देण्यात आली. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लग्नसमारंभ, राजकीय सभा आणि अन्य कार्यक्रमांचे मोबाईलद्वारे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करता येणार आहे. मोठ्या कॅमेऱ्यांची आवश्यकता न भासता मोबाईल आणि एका लिंकच्या साहाय्याने दूरस्थ ठिकाणांहूनही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणे शक्य होणार असल्याचे उमरीकर यांनी सांगितले. हे सॉफ्टवेअर सध्या छायाचित्रकारांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
वर्धमान फोटो एम्पोरियमचे निकेत जैन म्हणाले, “यापुढील काळात एआयशिवाय छायाचित्रकारांचे काम पूर्ण होणे कठीण होईल. त्यामुळे प्रत्येक छायाचित्रकाराने एआय तंत्रज्ञान शिकून घेणे आणि त्यासाठी आवश्यक उपकरणे व साधने जवळ ठेवणे गरजेचे आहे.”
मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमात रॉबिन सैनी, गणेश उमरीकर आणि निकेत जैन यांचा अमोल बोराडे, गणेश भेरे आणि पुरुषोत्तम देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऋषिकेश होशीग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर रमेश रावळे यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी प्रकाश किनाळकर, आनंद काळे, संजय चौबे, अजय कस्तुरे, गणेश भेरे आणि सुनील छत्रे, विजय उरगुंडे, दीपक काकडे, सचिन गोडसे, अमृता दांडगे, पवन अहिरराव, रोहन सरसांडे, शुभम पडघन, तुषार बोराडे, सचिन चांदगुडे, भारत राठोड, रोहित राठोड, भावना होशिंग, संदीप गरुड, गौरव गायकवाड, खुशवंत करमरकर, अमोल जाधव, नितीन अजमेरा, संतोष पाटील, धनंजय सोनार, गणेश जेजुरकर, राजू लांडे, भूषण जाधव
नितीन शेजवळ, अजय सरसंडे, शंकर रामचंदानी
संतोष पाटील, रणजीत उरगुंडे, कृष्णा बाहेती
अमोल सनानसे, विजय शिंपी, नरेंद्र शिंपी,सतीश गायकवाड, शाम काथार, संकेत कुलकर्णी, गणेश भालेराव, महिंद्रा टोपीवाला, अमित कुलकर्णी, रवी पडघन, कल्याण कुलकर्णी यांच्यासह अनेक छायाचित्रकार उपस्थित होते.
सेमिनारच्या यशस्वी आयोजनासाठी औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम, ऋषिकेश होशीग, सागर सोनार, गणेश उमरीकर, नरेंद्र देशपांडे, राजेश गोखलानी, अमोल बोराडे, उमेश तुर्कणे, संकल्प दांडगे, सुमीत निंबाळकर, मनोज होलिये, आणि गणेश जेजुरकर यांनी सहकार्य केले.

No Comment! Be the first one.