
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून, १९ दिवसांच्या उपोषणानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. १९ सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे.
मात्र, याच काळात मुंबईत गणेशोत्सवाची मोठी गर्दी असल्याने वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि गणेशभक्तांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत, जरांगे यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील जरांगे यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
No Comment! Be the first one.