रशियाकडून तेल खरेदी केल्यास संबंधित देशांना १०० टक्के आयात शुल्क लावण्याचा अधिकार मिळणाऱ्या विधेयकाला अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सने मतदान केले आहे. यामुळे आता भारतावरही १०० टक्के आयात शुल्क लागण्याची शक्यता आहे. तसंच, या विधेयकामुळे इराणवरील विद्यमान निर्बंधांचा कालावधी वाढवला जाणार आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
‘द लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ २०२६’ या विधेयकाने मंगळवारी संध्याकाळी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्समधील एक प्रक्रियात्मक अडथळा पार केला. यावेळी दोन डेमोक्रॅटिक खासदारांनी रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान केलं. हे विधेयक बुधवारी अंतिम मतदानासाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. रशियावरील निर्बंधांच्या विधेयकासह इतर काही कायद्यांना पुढे नेण्याचा हा ठराव २१४ विरुद्ध २११ मतांनी मंजूर झाला. या निकालामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्समधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

No Comment! Be the first one.