पाटसहून सुपेच्या दिशेने जात असलेल्या बारामती डेपोच्या एसटी बसला सुपे घाटात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. घाट चढत असताना बसचा मोसम तुटल्याने बस अचानक मागे सरकली आणि त्यानंतर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
MH 20 BL 3121 क्रमांकाच्या या एसटी बसमध्ये सुमारे 25 ते 30 शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातात यापैकी 2 ते 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. उर्वरित सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर सुखरूप असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
No Comment! Be the first one.