लोकार्थ प्रतिनिधी माधव रावण वागलगावे, चाकूर
जळकोट : येथील विजयवर्धिनी माध्यमिक शाळेत शनिवारी ‘चला बदल घडवूया’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख श्री. काटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी मोबाईल वापराचे फायदे आणि तोटे समजावून सांगत विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. सोनाली गोपाळ मुंडे हिचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
प्रथम सत्र परीक्षेत इयत्ता आठवी, नववी आणि दहावीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतील, अशी घोषणाही केंद्रप्रमुख काटे यांनी केली. यावेळी सोनाली मुंडे आणि निलेश लष्करे यांनी ‘चला बदल घडवूया’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वागलगावे सर आणि कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेदावाड सर यांनी केले, तर आभार पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



No Comment! Be the first one.