लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या आनंदात जवाहरनगर पोलिसांनी १२५ नागरिकांना अनोखी भेट दिली. हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल २८ लाख रुपये किमतीचे १२५ मोबाईल शोधून पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. विशेष म्हणजे, काही मोबाईल दोन वर्षांपूर्वी हरवले होते. इतक्या दिवसांनंतर मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार मारोती गोरे व राजेंद्र शिंदे यांनी तांत्रिक तपासातून हे मोबाईल शोधले. गुरुवारी (५ नोव्हेंबर) सिडको एन-७ येथील त्रिदेवता मंदिरात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते आयफोन, सॅमसंग, वनप्लस, विवो, मोटोरोला आणि ओप्पो यांसारखे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईलमधील जुनी छायाचित्रे आणि आठवणी पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. या कामगिरीमुळे १२५ कुटुंबांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
No Comment! Be the first one.