पालम तालुक्यातील शेखराजूर फाट्या जवळील घटना
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या 54 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री लोहा-पालम मार्गावरील अंजनवाडी शेख राजूर फाट्याजवळ घडली.
गुणवंत मुंजाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे चुलते सुधाकर नामदेव कांबळे (वय 54) हे दुचाकीवरून बहिणीला भेटण्यासाठी पेठशिवणी येथे जात होते. त्यावेळी लोह्याकडून पालमच्या दिशेने येणार्या एम.पी. 09 एच.एच. 2175 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुधाकर कांबळे यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुधाकर कांबळे यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

No Comment! Be the first one.