लोकार्थ प्रतिनिधी
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीचा फायनलचा सामना भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गतविजेत्या चीनला गोल्ड मेडलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण भारतीय खेळाडूंनी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मजबूत पकड बनवून ठेवली आणि ४४ वर्षांनंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून दिलं. या विजयासह भारतीय महिला संघ २०२८ मध्ये लॉस एंजिलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलविजेत्या चीनला या स्पर्धेत सिल्व्हर मेलडवर समाधान मानावं लागलं आहे.
भारतीय संघाची दमदार सुरूवात
या सामन्यातील पहिल्या क्वार्टरपासूनच भारताने चीनवर हल्ला चढवला. या सामन्यातील सहाव्या मिनिटाला बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळालं. पण तरीदेखील भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरूच ठेवला. दरम्यान भारतासाठी २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या लालरेमसियामीने पहिल्या क्वार्टरमधील १० व्या मिनिटाला पहिला गोल केला. हा या संपूर्ण सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल ठरला. त्यानंतर चीनच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक हल्ले केले. पण भारताच्या गोलकिपरने एकही गोल होऊ दिला नाही.

No Comment! Be the first one.