लोकार्थ रिपोर्ट
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण येथील गोदावरी नदीतून वाळूची तस्करी करणाऱ्या विरुद्ध ….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्यामुळे महसूल विभागाचे पितळ उघडे पडले…
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने शुक्रवार रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची तस्करी करणाऱ्या दोन हायवा वाहनावर कारवाई केल्यामुळे महसूल विभागाचे वाळू विरुद्ध पथकाचे पिताळ उघडे झाल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लहूराव घोडे, हवालदार विजय धुमाळ, सनी खरात, महेश बिरुटे यांनी सापळा लावून. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्यरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या दोन हायवा वाहनात वाळू भरून वाहतूक करीत असताना आढळून आले. या पथकाने सदरील हायवा वाहन चालकाकडं वाळू संदर्भातील परवाना बाबत माहिती घेतले असता. कुठलाही परवाना आढळून न आल्याने. दोन्ही वाहना वाळू सह एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून. आज या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्यामुळे. पैठण महसूल विभागाने वाळू विरुद्ध पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात येते परंतु या कारवाईमुळे. या महसूल पथकाचे पितळ उघडे पडल्याचे समोर आले आहे….
No Comment! Be the first one.