लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत, पीकविमा भरपाई व सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच चारा छावण्या, टँकर, मोफत धान्य, विद्यार्थ्यांची फी माफी आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.

No Comment! Be the first one.