लोकार्थ प्रतिनिधी –
छत्रपती संभाजीनगर : दीपावली सणानिमित्त विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता आणि हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शालेय विद्यार्थी व पालकांसाठी आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा मंगळवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने आकर्षक व रंगीबेरंगी आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वतः तयार केलेला आकाश कंदील दीपावलीत घरासमोर लावण्याचा आनंद विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कात्री, कटर, फेविकॉल, पट्टी, पेन्सिल, स्टेपलर व एक पतंग कागद सोबत आणावा. आकाश कंदील बनविण्यासाठी लागणारा अतिरिक्त कागद आयोजकांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक सुनील सुतवणे यांनी गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.