लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड : दुष्काळाने सारं मराठवाडा होरपळत असताना बिलोली तालुक्यातील कुंभारगाव-बेळकोणी येथील शेतकरी आनंदराव उमाजी मक्कापल्ले यांनी मात्र जिद्दीने फुलशेती बहरवली आहे.
पारंपारिक सोयाबीन-कापसाला फाटा देत त्यांनी अवघ्या 20 गुंठ्यात झेंडू फुलाची लागवड केली. 30 ते 40 हजार खर्च करून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्नाचे स्वप्न पाहिले आणि दुष्काळातही त्यांची फुलबाग बहरली आहे.
पावसाअभावी सोयाबीन गेले, बोर-विहिरी आटल्या, तरीही कमी पाण्यात झेंडू फुलांनी शेत फुलवले आहे. सध्या बाजारभावात घट असली तरी, या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करत नवा आदर्श घालून दिला आहे.
दुष्काळातही बहरते फुलती, हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आनंदराव मक्कापल्ले शेतकरी
No Comment! Be the first one.