उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा; विद्यार्थ्यांचे अर्ज शून्य शुल्कावर स्वीकारण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी सुजित शिंदे
धाराशिव राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली असतानाही महाविद्यालयांकडून प्रत्यक्षात परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार धाराशिव मध्ये समोर आला आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब शहरातील महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परीक्षा शुल्क वसुली तत्काळ थांबविण्याची मागणी केली. दहावी बारावीच्या धर्तीवर विद्यापीठांच्या परीक्षा अर्ज प्रणालीत सुधारणा करून विद्यार्थ्यांचे अर्ज एकही रुपया न घेता स्वीकारावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
आमदार कैलास पाटील,आमदार,ठाकरे गट
No Comment! Be the first one.