लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा विभागाच्या वतीनं सन 20२6-२7 या विभागस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचं आयोजन 13 व 14 ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आलं आहे. क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहसचिव पांडुरंग रणमाळ, डॉ. दिनेश वंजारे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, स्पर्धा प्रमुख तुषार आहेर, शिल्पा मोरे, राकेश खैरनार, अजय त्रिभुवन उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये तलवारबाजीच्या ईप्पी, फाईल, सेबर यांचे खेळप्रकारातील 14,17,19 वर्षातील मुले व मुली, जालना, बीड, हिंगोली, परभणी व छत्रपती संभाजीनगर येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतुन राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेकरीता खेळाडूंची निवड करण्यात येईल, असं जिल्हा क्रीडा अधिकारी मुकूंद वाडकर यांनी सांगितलं.

No Comment! Be the first one.