लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : आंतरशालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धा २०२६ (शहर विभाग) मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. विविध वयोगटांतील खेळाडूंनी यश मिळवत विभागीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला.
१४ वर्षांखालील मुलींच्या टाइम ट्रायल प्रकारात मनप्रीत कौर संघा व अर्निका कचेश्वर, तर मास्टर आर्ट प्रकारात संस्कृती गाढवे व इशान्वी देशमुख यांनी यश मिळवले. मुलांच्या १४ वर्षांखालील टाइम ट्रायलमध्ये साहिल शिंदे, चेतन मलानी व अनय जैन, तर मास्टर आर्ट प्रकारात रियान लोहाडे यांनी कामगिरी केली.
१७ वर्षांखालील मुलींच्या टाइम ट्रायलमध्ये गौरी दिवेदी, मुलांच्या गटात शौनक गायकवाड, तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात यशवर्धन गाडेकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

No Comment! Be the first one.