लोकार्थ प्रतिनिधी
नवी दिल्ली : हवेतच चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही कॉकपिटचा दरवाजा उघडून प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना हल्लेखोरावर मात करण्याची संधी देणाऱ्या भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांच्या धैर्याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सलाम केला आहे.
दुबई–तेल अवीव Flydubai FZ1073 विमानातील ओमानी नागरीक असलेल्या सहपायलटने कॅप्टन माछर यांच्यावर हल्ला केला. या झटापटीदरम्यान विमानाने अवघ्या काही सेकंदांत सुमारे १४ हजार फूट उंची गमावली. गंभीर जखमी असूनही माछर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर समोरील बाजूला असलेल्या प्रवासी व कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग सौदी अरेबियातील तबूक येथे करण्यात आले. विमानात १७४ जण होते.
या शौर्याचे कौतुक करत नेतन्याहूंनी X वर लिहिले की, माछर यांनी जखमी अवस्थेतही प्रतिकार केला आणि प्रवासी व क्रूला हल्लेखोरावर मात करण्यास सक्षम केले
“He is a true hero.” त्यांनी कॅप्टन माछर यांस लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
आकाशात संकट कोसळले… भारतीय पायलट जखमी झाला
पण त्याने हार मानली नाही;
१७४ जीव वाचवणाऱ्या या भारतीय योद्ध्याला आता इस्रायलच्या पंतप्रधानांचा सलाम!

No Comment! Be the first one.