नानलपेठ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला 30 वर्षीय युवक शुक्रवार (दि. 25) रोजी सकाळी पावणेअकरा वाजता रुग्णालयातील वार्ड क्रमांक 8 मधून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता युवकाबाबत काही माहिती मिळाल्यास अथवा तो आढळून आल्यास नानलपेठ पोलीस, परभणी येथे तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
राजू जयराम हिवाळे असे बेपत्ता युवकाचे नाव असून त्याला बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी झटका आल्याने कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर रोजी त्याचे वडील जयराम हिवाळे हे त्याच्यासोबत रुग्णालयात होते. डॉक्टरांसोबत औषधे घेण्यासाठी ते काही वेळ वार्डबाहेर गेले होते. ते औषधे घेऊन परतल्यानंतर राजू वार्डमध्ये दिसून आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या परिसरात तसेच अन्य ठिकाणी शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही.
बेपत्ता युवकाचा रंग सावळा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, सडपातळ बांधा, लांबट चेहरा, चेहऱ्यावर दाढी, सरळ नाक असून, बेपत्ता होताना त्याने पांढरा शर्ट व निळी पॅन्ट परिधान केली होती. डाव्या हातावर जखमांच्या खुणा असून उजव्या हातावर ‘चंदा’ असे नाव गोंदलेले आहे.

No Comment! Be the first one.