डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानातील मूल्यांचे स्मरण
लोकार्थ प्रतिनिधी, सुशिल गायकवाड
पूर्णा तालुक्यातील खडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे स्मरण करण्यात आले.
भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून त्यांचे आचरणात पालन करणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका संतोष शिंदे, सौ. मनीषा परशुराम हनवते, सौ. मीराताई मस्के, श्री. संतोष शिंदे, श्री. परशुराम हनवते, मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे, आनंद सोनटक्के, मुगाजी पिसाळ, गणेशराव भुरके, राम जेठेवाड, संभाजी गंद्रेवाड, श्रीमती वर्षा कांडुरे, श्रीमती स्वाती निराळवाड यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.

No Comment! Be the first one.