35 लिपीकांची नियुक्ती
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी शहरातील नागरिकांकडे थकीत असलेली मालमत्ता आणि पाणी कराची रक्कम वसुलीसाठी वसुली लिपिक सहाय्यक आयुक्त यांना कठोर सूचना देत वसुलीचे आदेश देऊन थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या आहेत.
महानगरपालिकेचे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, तुकाराम कदम यांच्या उपस्थित एक आक्टोबर रोजी प्रभाग समिती अ ब क यांचे सहाय्यक आयुक्त आणि वसुली लिपिकांची बैठक पार पडली. या बैठकीत एक एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत आढावा बैठक घेण्यात आली. यात केवळ 30 टक्के वसुली झाल्याचे सांगण्यात आले .उर्वरित वसुलीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामाला लागावे अशा सूचना उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम यांनी सहाय्यक आयुक्त आणि वसुली लिपिक यांना दिल्या. यासाठी 35 वसुली लिपिकांची नियुक्ती करण्यात आली. थकबाकीदार असलेले मालमत्ता धारक, नळपट्टी धारक यांना तात्काळ नोटिसा देण्यात याव्यात अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. या बैठकीत सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी अवेज हाश्मी, कर निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला तीनही प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त वसुली लिपिक उपस्थित होते.

No Comment! Be the first one.