लोकार्थ प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आज काढलेल्या मोर्चामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली असल्याने संसद भवनापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला आहे. मात्र निवडणूक आयोगाला धडक देण्याच्या निर्णयावर ठाम असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या दिशेने कूच केली. मात्र आकाशवाणी भवन परिसरात पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या दिला आहे.
No Comment! Be the first one.