वैजापूर हद्दीत आंदोलक रस्त्यावर; महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
वैजापूर : रोहित अनिल पठारे मृत्यू प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी समृद्धी महामार्गाच्या वैजापूर हद्दीत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी रोहित पठारे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून, विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

No Comment! Be the first one.