लोकार्थ प्रतिनिधी शरद म्हेकरे
लातूर : शहरातील स्क्रॅप मार्केटमध्ये आज अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच फायर फायटरच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव जमला. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्क्रॅपमधील ज्वलनशील साहित्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाकडून काळजीपूर्वक आग विझविण्याचे काम सुरू आहे.
आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. याबाबत पोलीस व संबंधित प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे.
No Comment! Be the first one.