लोकार्थ प्रतिनिधी माधव वागलगावे
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवून आणण्याबरोबरच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि देशप्रेमाची भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. बदलत्या काळातील नवीन तंत्रज्ञानाची आव्हाने स्वीकारून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचा भारत घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शिक्षक हेच राष्ट्रनिर्मितीचे खरे भाग्यविधाते आहेत, असे प्रतिपादन प्रशिक्षण प्रमुख तथा व्याख्याते विजयकुमार सायगुंडे यांनी केले.
अहमदपूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गट साधन केंद्र आणि संबंधित शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रमात ते शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सायगुंडे म्हणाले की, शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास घडविणे, त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जपणूक करणे, जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक घडविणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अध्यापन पद्धती आणि भविष्यातील शैक्षणिक आव्हानांना शिक्षकांनी सामोरे जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे. शिक्षकांच्या संस्कारातूनच उद्याचा भारत घडणार असून राष्ट्रनिर्मितीच्या महान कार्याचे शिल्पकार शिक्षकच आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शिक्

No Comment! Be the first one.