कागदोपत्री निर्णय नको, बांधावर जाऊन मदत द्या!
घनसावंगी प्रतिनिधी अविनाश घोगरे
दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यात शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय काळबांडे आक्रमक झाले आहेत.
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काळबांडे यांनी केली आहे.
तसेच दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात आणि शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
दरम्यान, शासनाने केवळ कागदोपत्री निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी संजय काळबांडे यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.