लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
खान्देश दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीचे अध्यक्ष स्वप्निल भैया भारती यांना राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव, विशेष सन्मान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री.भारती यांनी दशनाम युवक प्रतिष्ठान परभणी या दशनाम संघटनेच्या माध्यमातून दशनाम गोसावी समाजाची खूप मोठी चळवळ परभणी जिल्ह्यामध्ये उभी केलेली असून या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दशनाम गोसावी समाजाचे असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत.जिल्हाभरातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोणत्याही समाज बांधवांच्या अडचणीसाठी धावून जाणारा,अहोरात्र तळमळीने काम करणारा समाज बांधव म्हणून स्वप्नील भैया भारती मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राज्यस्तरावर दशनाम गोसावी युवा समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रम धुळे येथे दिनांक 27 सप्टेंबर रोजी पार पडला. भारती यांना पुरस्कार प्रदान करत असताना व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.यशवंत गोसावी,उद्घाटक डॉ.धर्मवीर भारती, प्रमुख पाहुणे प्रतीक गोसावी , प्रा.सुरेश पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब गोसावी ,अमोल भारती यांनी केले होते.
स्वप्नील भारती यांना राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज भुषण पुरस्कार
Related Posts
मोबाईलच्या एका क्लिकवर पाणीपुरवठा!
October 3, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संजय काळबांडे आक्रमक
October 3, 2026
No Comment! Be the first one.