शेतातील पिकांच्या नुकसानीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांशी साधला संवाद
खुलताबाद : प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यातील सराई येथे आज सकाळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पिकांची वाढ आणि संभाव्य नुकसान याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम तसेच शेतीच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडूनही परिस्थितीची माहिती घेण्यात आली.
खुलताबाद तालुक्यातील शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत असून, पिकांच्या नुकसानीचे योग्य मूल्यमापन होऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे सराई परिसरातील शेतीच्या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी अंकिता ताकभाते, तहसीलदार संतोष गुट्टे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, गटविकास अधिकारी गिरीश सोनार, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी बंडू आव्हाड, कृषी सहाय्यक प्रीती डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

No Comment! Be the first one.