दत्तनगरमध्ये ड्रेनेजचा कहर! आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील दत्तनगर परिसरात ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. नवीन आणि जुन्या ड्रेनेज लाईनचे जॉईंटिंग व्यवस्थित न झाल्यामुळे ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ड्रेनेजमधील दुर्गंधीयुक्त घाण आणि सांडपाणी रस्त्यावर तसेच रिकाम्या फ्लॅटमध्ये साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांची तब्येत बिघडल्याचा दावा स्थानिक नागरिक करत आहेत. काही नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येची महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी आणि साचलेले सांडपाणी हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
बाईट… संग्राम पांचाळ
स्थानिक नागरिक दत्तनगर नांदेड
No Comment! Be the first one.