लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर डीजे वाजविण्यास बंदी असल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी छोट्या टेपवर गाणी लावत विसर्जन मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा केला. डीजेच्या आवाजावर निर्बंध असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र शहरातील विविध मिरवणुकांमध्ये पाहायला मिळाले.
जालना शहरात गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवर गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू असून, जवळपास २०० ते २५० गणपतींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देत आहेत.
डीजेवर बंदी असल्यामुळे काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी छोट्या टेपवर गाणी लावत मिरवणुकीत नृत्य करत आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी मिरवणुकीदरम्यान वाद झाल्याचेही समोर आले, तर अनेक ठिकाणी शांततेच्या वातावरणात विसर्जन मिरवणुका पार पडल्या.
No Comment! Be the first one.