लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
गंगापूर : नांद्राबाद येथील गमर पेट्रोलपंपावर १ लाख ३० हजार रुपयांची सशस्त्र लूट करणाऱ्या तिघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. तुषार बर्डे, संदेश खंडागळे आणि विकास मावस अशी आरोपींची नावे आहेत. यातील तुषार व संदेश हे पंपावरील कर्मचारी आहेत.
शनिवारी (२६ सप्टेंबर) मध्यरात्री कत्ती व लाकडी दांड्याचा धाक दाखवत केबिनमधील ड्रॉवर फोडून रोकड लुटण्यात आली होती. तपासात पंपावरील कर्मचाऱ्यांनीच तिसऱ्या साथीदारासोबत लुटीचा कट रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिघांकडून लुटलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली.
No Comment! Be the first one.