गेल्या चार वर्षांत लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराने मोठा उच्चांक गाठला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या काळात देशभरातील तब्बल १११ निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांनी आपला मूळ पक्ष सोडला आहे. ‘इंडिया टूडे’ नं हे वृत्त दिलं आहे.
पक्ष बदलणाऱ्या या १११ लोकप्रतिनिधींपैकी २६ टक्के (२९ जण) लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या यादीत नागा नॅशनल फ्रंट (NPF) पहिल्या स्थानावर आहे.
‘एडीआर’ आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ने २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. या काळात २६ लोकसभा खासदार, ७ राज्यसभा खासदार आणि ७८ आमदारांनी पक्षांतर केले किंवा पक्ष बदलले.

No Comment! Be the first one.