पंचक्रोशीत मात्र भीतीचे वातावरण..
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबीलवादे –
पैठण तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी आपेगाव येथील शेतकरी महिला ताराबाई दिनकर ठेंनगे आपल्या शेतातील सरकीला पाणी देत असताना अज्ञात तीन चोरट्यांनी प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून डोळ्याखाली चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती.तर दुसऱ्या दिवशी या शेतकरी महिलेच्या मुलाची युनिकॉन कंपनीची मोटरसायकल रविवारी दि.२७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारेस चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी, महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे,बीट जमादार राजेंद्र जिवडे यांनी आपेगाव गावातील चोरीची घटना घडलेल्या घराजवळील व आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून धुमाकूळ घालून चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत अज्ञात चोरट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ताराबाई दिनकर ठेंनगे आईला पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून रविवारी रोजी रात्री आपल्या घरी आपेगाव येथे परत येऊन आपल्या घरासमोर ज्ञानेश्वर दिनकर ठेंनगे यांनी मोटरसायकल क्रमांक MH20 HL-7794 नेहमीप्रमाणे उभी केली होती. या रात्री चोरट्याच्या हल्ल्यात जखमी करून अंगावरले दागिने लुटून नेणाऱ्या चोरट्याच्या संदर्भात जखमी महिलेच्या कुटुंबाकडून चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आपेगाव येथे आले होते. हे पोलीस पथक माघारी फिरल्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास या शेतकरी महिलेच्या मुलाची चार महिन्यापूर्वी खरेदी केलेली युनिकॉन कंपनीची मोटरसायकल चोरट्याने चोरून पैठण पोलिसांना खुले आवाहन दिल्याचे या घटनेवरून दिसत आहे. या वारंवार चोरीच्या घटनेमुळे आपेगाव पंचक्रोशीच्या परिसरात वाड्या वस्तीवर राहणारे शेतकरी व महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर दिनकर ठेंनगे यांनी तक्रार दिली असून महिला शेतकऱ्याला लुटमार करून अज्ञात चोरट्याने दागिने लुटून नेल्यानंतर पुन्हा या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालून पैठण पोलिसांना खुले आवाहन दिल्यामुळे पोलीस तपासाकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.