सर्वपक्षीय संघटनेचे पैठणमध्ये आंदोलन.
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्याची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या मागणीसाठी पैठण येथील तहसील कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या पाणी वाटप नियोजनाच्या धोरणाचा निषेध करून नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत.
सर्वपक्षीय निवेदनात म्हटले आहे की नाथसागर धरणाच्या कालव्यांना सुरू असलेल्या पाणीविसर्गाचा पुनर्विचार करा. औद्योगिक पाणीवापरात कपात, फळबागांसाठी मोफत विडमेट आणि धरणग्रस्तांसाठी ५ टक्के पाणी आरक्षणाच्या मागणीसह
डावा व उजवा कालव्यामध्ये सुरू असलेल्या पाणीविसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगाम आणि पुढील काळातील संभाव्य पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून जलसाठ्याचे नियोजन करावे, धरणातून दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद करणे. शेती सिंचनासाठी प्राधान्य देऊन पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करणे अशा मागण्या सर्व सामाजिक संघटना व छावा क्रांतिवीर सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनानी केली. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन लेखी कार्यवाही अहवाल द्यावा. अन्यथा उपलब्ध वैधानिक व लोकशाही मार्गाने पुढील भूमिका घेण्यात येईल, असा इशारा सर्व सामाजिक संघटना व शेतकरी बांधवांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत, पवन शिसोदे, ज्ञानदेव मुळे, साईनाथ कर्डिले, किशोर तांगडे, ज्ञानेश्वर उगले, प्रशांत देशमुख, सुभाष नवथर, आशिष औटे, दत्ता निवारे, नितीन मोरे, कृष्णा काळे, भगवान सोरमारे, रामेश्वर बावणे, आदी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.