लोकार्थ प्रतिनिधी
टाटा समुहाची पालक कंपनी टाटा सन्समध्ये सध्या अंतर्गत संघर्ष सुरू आहे. टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या कारभाराविरोधात विश्वस्त वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. यावर आता महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट संबंधित तक्रारींवर उत्तर देण्यास सांगितले आहे. या दोघांनी ट्रस्टच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे

No Comment! Be the first one.