लोकार्थ प्रतिनिधी सुजित शिंदे धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऊसाला एकरी ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत. याच मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला साखर कारखानदार, गूळ-पावडर उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. ऊस दराबाबत शेतकरी संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करत एकरी ५ हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, बैठकीत या मागणीवर ठोस तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेता ऊसाला योग्य दर मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आता ऊस दराच्या प्रश्नावर प्रशासन आणि कारखानदार पुढील कोणती भूमिका घेतात, याकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.