लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड येथे स्कूल बस असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), नांदेड येथे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून स्कूल बसशी संबंधित विविध प्रश्नांकडे आणि समस्यांकडे परिवहन विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गांधीगिरीच्या मार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनातून असोसिएशनने आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्कूल बस चालक आणि मालकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनामुळे स्कूल बस असोसिएशनच्या प्रश्नांची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, परिवहन विभाग यावर कोणती भूमिका घेतो, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
निखिल लातूरकर
अध्यक्ष स्कूल बस असोसिएशन नांदेड
No Comment! Be the first one.