लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगर : कचनेर तांडा क्रमांक ५ येथील शेत गट क्रमांक १३९ आणि १४१ मध्ये बेकायदा गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली. या कारवाईत २४१ गांजाची झाडे, एकूण १८२.०२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे २७ लाख ३० हजार ३०० रुपये आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी व १५ अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली. शेतजमीन धारकांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिकलठाणा पोलिसांकडून सुरू आहे.

No Comment! Be the first one.