लोकार्थ मीडिया
नोव्हेंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण; मात्र या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही!
नवी दिल्ली | विशेष वृत्त
भारतीय राजकारणात पंतप्रधानपदाइतके चर्चेत राहणारे दुसरे पद क्वचितच असेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय भूमिकांबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्यातच आता एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय चर्चेला नवा विषय दिला आहे.
‘Prashanth Kini’ या नावाच्या आणि ‘@AstroPrashanth9’ या हँडलवरून वर्षभरापुर्वी प्रसिद्ध झालेल्या पोस्टमध्ये नोव्हेंबर २०२६ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून बाजूला होतील, त्यानंतर अमित शहा नोव्हेंबर २०२६ ते मे २०२७ या काळात पंतप्रधान होतील आणि जून २०२७ मध्ये योगी आदित्यनाथ देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील, असे भाकीत करण्यात आले आहे.
या पोस्ट मधील दाव्यांवर किनी है आजही ठाम आहेत हे त्यांच्या X वरील हॅंडल वरुन दिसून येते आहे.
मोदीनंतर कोण हा प्रश्न भारतीय राजकीय वर्तुळात चर्चीला जात असताना मोदीनंतर गृहमंत्री अमित शहा, ऊत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत असतात.
किनी यांनी हे भाकीत 2026 ते 2029 या कालावधी करीता केले आहे.
राष्ट्रपती निवडणूक आणि ऊत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका हा या घडामोडींचा संभाव्य केंद्रबिंदू मानला जात आहे.
या दाव्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी या कथित सत्तांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या पोस्टकडे राजकीय घडामोडींची खात्रीशीर बातमी म्हणून नव्हे, तर सोशल मीडियावरील एक अप्रमाणित भाकीत म्हणून पाहणे आवश्यक आहे.
मोदी–शहा–योगी समीकरणाची चर्चा पुन्हा ऐरणीवर?
भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे तिन्ही नेते महत्त्वाचे आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कोण पुढील पंतप्रधान होणार, नेतृत्वात बदल कधी होणार किंवा कोणत्या नेत्याकडे केंद्रातील सर्वोच्च पदाची जबाबदारी येणार, याबाबतचे निर्णय केवळ ज्योतिषीय भाकितांवरून ठरत नाहीत.
सामान्य नागरिकांनी काय समजून घ्यावे?
राजकीय सत्तांतराची चर्चा आकर्षक असू शकते. मात्र, व्हायरल पोस्ट, ज्योतिषीय अंदाज आणि अधिकृत बातमी यांची सरमिसळ झाल्यास चुकीची माहिती पसरू शकते. त्यामुळे या पोस्टमधील तारखांना निश्चित राजकीय कार्यक्रम समजणे योग्य ठरणार नाही.
No Comment! Be the first one.