नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी पोलिसांची विशेष कारवाई.
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
संतोषीमातानगर परिसरात एका इसमाने गावठी कट्टा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत १९ वर्षीय प्रियांशु सतीष खोमणे याला ताब्यात घेतले.
त्याच्या सांगण्यानुसार संतोषीमातानगर येथील मैदानाच्या भिंतीलगत लपवलेला गावठी कट्टा मॅगझिनसह जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
No Comment! Be the first one.