आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पाठपुराव्याला यश; उपोषणकर्त्यांच्या योगदानाचीही दखल
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – जिल्ह्यातील सन २०२३ च्या थकीत पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांतील २५ हजार २९४ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या प्रश्नासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत शेतकऱ्यांची बाजू संबंधित मंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. तसेच हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचेही या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळून त्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणे, हीच माझी भूमिका आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील,”असे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्पष्ट केले.
No Comment! Be the first one.