समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीच्या बैठकीत एकजुटीचा निर्धार; आंदोलनाची दिशा ठरविण्यावर चर्चा
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (ता. ११) एका खासगी हॉटेलमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी आजी-माजी आमदार, माजी खासदार आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्त अभियंता अरुण घाटे, जयसिंग हिरे, यांनी नदीजोड प्रकल्पाचे सादरीकरण केले.
माजी आमदार फौजिया खान यांनी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नावर एकत्र येतात, त्याच धर्तीवर मराठवाड्यातील आजी-माजी आमदार आणि खासदारांनी एकजूट दाखवावी, असे त्या म्हणाल्या.
आमदार कैलास पाटील यांनी, अन्याय करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा करण्याऐवजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणावा, असे सांगितले. पाण्याच्या प्रश्नावर मतदान झाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. आमदार प्रशांत बंब यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील आमदारांपर्यंत हा विषय नेण्याची तयारी दर्शविली.
आमदार रमेश बोरनारे यांनी, मराठवाड्यातील आमदारांनी एकत्रितपणे पाठपुरावा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. लक्षवेधी सूचनेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानंतरही बैठक न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार संजना जाधव यांनी दुष्काळ जाहीर केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. नदीजोड प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवावा लागेल, असे सांगितले. पुढील बैठकीला मराठवाड्यातील सर्व महिला आमदारांना सोबत आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन दबावगट तयार करण्याची सूचना केली. हिवाळी अधिवेशनापूर्वी मराठवाड्यातील मंत्र्यांशी चर्चा करण्याचेही त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त अधिकारी शंकर नागरे यांनी मराठवाड्याच्या पाणीहक्काचा मुद्दा मांडला. माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आंदोलन, पाणी परिषदा आणि गोदावरी महामंडळावर मोर्चा काढण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी आमदार विलास भुमरे, हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने, रमाकांत पुलकुंटवार, जगदीश पाटील, प्रेम राज गायकवाड, अशोकराव दाबके, विजय हार्दे, बाबासाहेब दांडगे, कडुबा कुमावत, दत्तू पाटील, नारायण जाधव, हाटेसिंग चौधरी, प्रकाश आहेर, आदी उपस्थित होते. डॉ. सदाशिव पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आभार मानले.
मराठवाड्याच्या हक्काचे 255 टीएमसी पाणी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शासनावर दबाव निर्माण करावा. केवळ पत्रव्यवहार आणि आश्वासनांवर अवलंबून न राहता, हक्काच्या पाण्यासाठी व्यापक आंदोलन उभारण्याची गरज आहे, असा निर्धार मराठवाडा समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काचे 255 टीमसी पाणी विनाविलंब मिळावे यासाठी आयोजित लोकप्रतिनिधी बैठकीत मनोगत व्यक्त करताना मराठवाडा समन्यायी पाणी वाटपसंघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ आण्णासाहेब शिंदे

No Comment! Be the first one.