ज्ञानेश कुमार गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला; काही काळ वाहतूक ठप्प
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निराला बाजार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘ज्ञानेश कुमार गो बॅक’ अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
No Comment! Be the first one.