लोकार्थ प्रतिनिधी
भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत औपचारिक चर्चा होण्यापूर्वी प्रस्तावित नावांवर सरकारशी चर्चा करत असत, असा दावा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी केला आहे. सरकारकडून आधीच ‘पूर्वसंमती’ (Pre-approval) घेण्यासारखी ही प्रक्रिया असल्याने आपण तिच्याशी असहमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसाठी पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती कौल यांनी हा खुलासा केला.
न्यायमूर्ती कौल यांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजियमची बैठक सुरू असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना बाजूला एका स्वतंत्र बैठकीत नेले. त्यानंतर प्रस्तावित न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण सरकारला फोन करावा का, अशी विचारणा त्यांनी कौल यांच्याकडे केली. आपण त्यास नकार दिला, असं न्यायमूर्ती कौल यांनी नमूद केलं.

No Comment! Be the first one.