लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना जिल्ह्यातील वरूड येथील महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाला निवेदन सादर केले
वरूड येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. मात्र, सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करणे कठीण होत असल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने बचत गटाचे कर्ज माफ करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, कर्जफेडीचा वाढता भार लक्षात घेता संबंधित कंपनीने महिलांना दिलासा द्यावा. तसेच शासनाने या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली
या निवेदनावर गणेश मस्के, कासाबाई गायकवाड, सुमनबाई मस्के, नंदाबाई काटकर, लताबाई काटकर, ताराबाई कुंडकर, शकुंतराबाई परळकर, मिराबाई वाहुळकर, अनिताबाई बोर्डे, सत्यभामा वाहुळकर, गोदावर सुरसे, अशामती सोनुने, कल्पना खरात, शोभा वाहुळे, सुनीता पवार, मीरा शिंदे, गीवेणी गायकवाड, अंजना गायकवाड, सुमनबाई गायकवाड, वंदना सातपुते आणि ज्योती घुले यांच्यासह वरूड येथील महिलांची नावे आहेत.
No Comment! Be the first one.