बाईक रॅलीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी…
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 151 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने जालना शहरात भाजपच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील संभाजीनगर येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे माजी आमदार कैलास गोरट्याल महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत स्थायी समितीचे सभापती अशोक अण्णा पांगळकर सभागृह नेता महेश निकम नगरसेवक दुर्गेश कुरील नगरसेवक महावीर ढक्का नगरसेवक विक्रांत ढाका नगरसेवक निलेश गोर्डै नगरसेवक जीवन सल्ले यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No Comment! Be the first one.