लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यपाल बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी बागडे यांनी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला. यावेळी मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
No Comment! Be the first one.